Pages

Followers

Monday, 26 November 2018

कॉल बारिंग (Call Barring ) काय आहे ? ? (What is Call Barring...? in marathi )

             
मित्रांनो मोबाईल फोन च्या मध्ये असे अनेक काही फीचर्स आहेत त्या बद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल .
 असेच एक फीचर्स आहे ते म्हणजे कॉल बारिंग (Call barring ) या फीचर्स बद्दल माझ्या मते फारच कमी लोकांना माहीत असेल .तसे पाहिले तर हे फीचर्स फार महत्वाचेच  आहे , आणि हे फीचर्स जवळपास सर्वच फोन्स मध्ये उपलब्ध असते .
         तर आजच्या या पोस्ट मध्ये जाणुन घेऊया की call barring काय आहे  ? ते कशा प्रकारे use करावे ? आणि त्याचे फायदे काय आहेत ? ?
   
         पहिल्यांदा त्याचा फायदा काय ते पाहुया , ..
समजा आपला मोबाईल एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने घेतला  आणि तो त्याच्यावरून  सहजपणे कॉल करु शकतो , पण call barring जर active असेल तर तो आपल्या शिवाय कॉलच करु शकणार नाही .  कारण तो जेव्हा कॉल करेल तेव्हा तिथे password टाकावा लागेल , आणि तो फक्त आपल्यालाच माहित असेल .
  कधी कधी आपल्याला वाटते की आपल्या मोबाईल मध्ये फक्त इनकमिंग  कॉलच आले पाहिजे आउट गोईंग बंद पाहिजे .अशा वेळी call barring चा उपयोग होतो .
   एखाद्या वेळेस आपल्याला अनेक असे फालतू calls येतात किंवा एखादा call करून त्रास करत असेल तर या सर्व  येणाऱ्या calls ला तुम्ही ब्लॉक करु शकता .यां सारखे वापर call barring मुळे करता येतात
     
     कॉल बारिंग चा साधारण पणे अर्थ म्हणजेच कॉल थांबवणे , जर तुम्हाला वाटत असेल की कोणत्याही प्रकारचे आऊट गोईंग कॉल (outgoing calls ) block करायचे आहेत किंवा आपल्या फोन मधुन कोणीही इंटरनेशनल कॉल करु शकणार नाही या प्रकारचे कॉल ब्लॉक करायचे आहेत .तर हे तुम्ही call barring च्या मदतीने करु शकता .
      कॉल  बारिंगच्या मदतीने खालील गोष्टी करु शकता ...-

   १)    मोबाईल मध्ये सर्व outgoing  calls ब्लॉक करु शकता .

    २)  सर्व  incoming calls ब्लॉक करु शकता .

    ३)   सर्व  roaming calls ब्लॉक करु शकता .

    ४)    सर्व international calls ब्लॉक करु शकता .

    या सर्व गोष्टी होऊ शकतात .याचा उपयोग तर तुम्हाला समजलाच असेल ,
 आता याला चालु किंवा बंद कसे करावे ते पाहुया ,

          =>   Call barring  ला  Activete/Deactivate कसे करावे ? ? 

 कॉल बारिंग activete करण्यासाठी किंवा deactivate करण्यासाठी सर्वप्रथम फोन च्या सेट्टिंग मध्ये जावे .
phone  setting open केल्यावर call barring चा option दिसेल त्यावर क्लिक करावे .


 
       Call barring open झाल्यावर  त्यामध्ये अनेक पर्याय येतील त्याच्यातील तुम्हाला जे ब्लॉक करायचे आहे त्यावर क्लिक करावे .



एखाद्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तिथे तुमच्या कडून एक कोड मागितला जाईल तो कोड नंबर टाकायचा आहे ,  कोड नंबर साठी तुम्ही तुमच्या नेटवर्क ऑपरेटर ला सम्पर्क साधावा .
     
        deactivate करण्यासाठी याच पद्धतीने जाऊन  Cancel All या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर सर्व  Request cancel होतील .

                          अशा  पद्धतीने तुम्ही call barring सेवा activet किंवा deactivate करु शकता .

                                                   *     धन्यवाद *

 या बद्दल काही प्रतिक्रिया असतील तर जरूर कळवा ...

2 comments:

Anonymous said...

धन्यवाद!खपच चांगली आणि महत्वपूर्ण माहिती दिलीत आपण.

Anonymous said...

धन्यवाद खूप छान माहिती दिली

Android mobile मध्ये Screen lock / Pattern lock /Pin lock कसे लावावे ..? ?

  नमस्कार मित्रांनो,   आज च्या  या पोस्ट मध्ये  आपण  जाणुन घेणार आहोत की  screen lock /pattern  lock  किंवा pin lock  कसे  set करतात ... ...