Pages

Followers

Thursday, 22 November 2018

Android mobile मध्ये टॉकबॅक (Talkback) option ला चालू किंवा बंद कसे करावे ..! ! ? ? ? (How to on/off Talkback options in android mobile..? in marathi )


  1. नमस्कार  मित्रांनो  ...मोबाईल  मध्ये  काही सेटिंग  अशा आहेत  ज्या दिसत नाही .जसे  developer options आणि काही settings  अशा आहेत ज्या मोबाईल च्या सेट्टिंग च्या आत मध्ये भेटतात .आज  अशाच एका  option बद्दल आपण माहीती घेऊया , या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत   talk back option  काय  आहे  ?  ते कसे  on /off  करावे ? त्याचा उपयोग काय आहे  ?  ? चला तर मग सुरवात करूया ..

       Talkback एक eccessibility (प्रवेशयोग्यता) फिचर आहे , जे कोणत्याही Android Mobile मध्ये उपलब्ध असते , याला Google Talkback नावाने सुद्धा संबोधले जाते ,
  एक महत्वाची गोष्ट म्हणजे ...
        या option चा उपयोग जास्त करून त्यांच्या साठी होतो , ज्यांना कमी दिसतं ,  म्हणजेच ज्यांची नजर कमजोर  आहे त्यांच्या साठी  talkback option खुप फायदेशीर आहे .
     
       =>   Talkback चा उपयोग 
        जर या option ला तुम्ही Activet कराल तर याच्या मदतीने तुम्ही एखाद्या option वर क्लिक केल्यानंतर  मोबाईल vibrate होईल  एवढेच नाही तर  vibrate बरोबर तुम्ही कोणत्या option  वर क्लिक केले आहे हे तुम्हाला मोबाईल बोलुन सुध्दा दाखवेल .यामुळे सहज समजते की आपण कोणत्या  option वर टच केले . आणि महत्वाचे म्हणजे त्या ऑप्शन ला select करण्यासाठी त्यावर तुम्हाला दोनदा (double ) क्लीक करावे लागेल .अशा प्रकारे या option चा उपयोग करतात .
       
        जर एखाद्या  साधारण यूज़र्स ने नकळत याला activet  केलं , आणि याबद्दल त्याला  काहिही माहीती नाही , तर मोबाईल हाताळणे त्याला फार कठीण जाईल . अशा वेळी बऱ्याच जणांना माहीती नसते की या option ला बंद कसे करावे .
 
     चला तर मग आज जाणुन घेऊया की ,  android मध्ये  Talkback option  ला  on /off कसे करावे ..

=>    Talkback  on/off कसे करावे  ? ? 

         पहिल्यांदा आपण पाहुया  Talkback चालु  कसे करावे ..


१)     पहिल्यांदा  setting मध्ये जाऊन  accessibility  option  वर  क्लिक करा .
   
     

२) Accessibility  वर  क्लीक  केल्यानंतर  अनेक option  दिसतील  यामध्ये  तुम्हाला  talkback  ऑप्शन शोधुन  त्यावर  click  करायचे आहे .


३)  talkback  ऑप्शन वर क्लीक केल्यानंतर  talkback  on/ off  करण्याचा  ऑप्शन दिसेल , त्यावर क्लीक केल्या नंतर  talkback  option  activate होईल .


अशा प्रकारे  talkback  options  चालु  म्हणजे  active  करायचा .

आता पाहुया याला बंद कसे करायचे 
Talkback  options  ला  बंद  कसे करावे .

मोबाईल मध्ये Talkback बंद करण्याच्या दोन पद्धती आहे .
१)   पहिली पद्धत म्हणजे , जसे तुम्ही talkback चालु करण्यासाठी वापरली त्याच  पद्धतीने जाऊन  त्याला बंद करावे .
२)  दुसरी पद्धत म्हणजे आवाजाचे बटण - या मध्ये तुम्हाला  आवाजाचे वरचे बटण  (Volume Up key) +  आवाजाचे खालचे बटण  (Volume dawn key  ) या दोन्ही  बटनांना  एकत्र  ४-५ सेकंद दाबुन ठेवायचे आहे .त्यानंतर तुम्हाला  talkback  deactivate करण्याचा  option मिळेल  , तिथे तुम्हाला  ok  वर  दोनदा  (Double ) क्लिक करायचे आहे .ok वर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईल मध्ये talkback  option  बंद होईल .

तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही android  फोन मध्ये  google talkback चालु किंवा बंद करु शकता .

तर मित्रांनो  ही पोस्ट कशी वाटली , या बद्दल काही प्रतिक्रिया  काही शंका असतील तर  comment मध्ये जरूर कळवा .
आणि मित्रांना पण share करा ..

             *  धन्यवाद  *

      *  Good day *

No comments:

Android mobile मध्ये Screen lock / Pattern lock /Pin lock कसे लावावे ..? ?

  नमस्कार मित्रांनो,   आज च्या  या पोस्ट मध्ये  आपण  जाणुन घेणार आहोत की  screen lock /pattern  lock  किंवा pin lock  कसे  set करतात ... ...