Pages

Followers

Monday, 5 November 2018

Android developer option आणि त्याचे फायदे ....( Android Developer Options & its Benefits....! ! in marathi )

 नमस्कार मित्रांनो  आज आपण  या  पोस्ट मध्ये जाणुन घेऊया Android developer option आणि त्यांचे काही  फायदे 
         मित्रानो जर तूम्ही android mobile वापरता , तर त्यामध्ये तुम्हाला Android devloper options माहीत असेलच , कींवा  काहिंना हे काय आहे  याचि भनक सुद्धा नसेल.  तर पहिल्यादा मी त्यांना सांगताे की , Android developer options हे  एक advanced फीचर  असते ,  जे   सर्व  मोबाइल  मध्ये असतेच .  आणि खास म्हणजे ते लपवलेले असते. तर तुम्हाला ते active करायचे  असते . तेव्हाच तुम्हाला  हा  devloper option दिसेल ,  अन्यथा दिसणार नाही. 
      developer option दिसण्यासाठी,  म्हणजेच active करण्यासाठी तुम्हाला मोबाईल च्या setting  मधे जाऊन about मध्ये जायचे आहे , तिथे तुम्हाला software version किंवा  build version  असा  option दिसेल , त्यावर तुम्हाला 6-7 वेळा क्लिक करायचे आहे ,यामुळे developer option  active म्हणजेच unlock  होईल.
        तर या मग आता , याच्यामधल्या    फीचर्स बद्दल माहिती घेऊया .यामध्ये खुप सारे options  आहेत , पण आपण इथे काही जरूरी फीचर्स  बद्दल जाणून घेऊया.

   1)  Take bug report -  या option वर click केल्यावर  तुमच्या device चा status एका फाईल च्या रुपात save होऊन तुम्हाला तो काही वेळा नंतर notification bar मध्ये दिसेल .

    2) Stay Awake -    मित्रांनो हा option तुम्हाला जवळपास सर्वच Android  version मध्ये मिळेल , मग तो lolipop असो किंवा jellybean कींवा marshmallow असो , या option ला जर तुम्ही active केल तर तुमच्या मोबाईल ची screen light बंद होणार नाही ,    म्हणजे ...थोडं स्पष्ट सांगतो , 
जेव्हा तुम्ही mobile charge साठी लावणार तेव्हा मोबाईल स्क्रीन ऑनच राहील जोपर्यंत तुम्ही charger disconnect करणार नाही .

    3) OEM Unlock -     OEM unlock म्हणजेच original Equipment Manufacture unlock असा याचा full फॉर्म आहे .
 OEM unlock  हे फीचर खुपच उपयोगाचे आहे .याचा उपयोग म्हणजे जर तूम्ही तुमच्या मोबाइलला custom rom ने अपग्रेड करणार असाल तर या option ला active करावे लागेल . 
   हे फीचर तुम्हाला Android lolipop किंवा त्याच्या अधिक वर्जन वाल्या  android phones मधे मिळेल .
    
     4)  USB Debugging -   या ऑप्शन चा खुप फायदा आहे , आणि या बद्दल बऱ्याच जणांना माहीती  पण असेल . याचा उपयोग म्हणजे तुम्ही जेव्हा मोबाईलला  कॉम्प्युटरशी connect कराल किंवा करायचे असल्यास , या option ला activet करावे लागेल तरच तुमचा मोबाईल कॉम्पुटरशी कनेक्ट होईल .

     5)  Running  Service -    या option च्या मदतीने तुम्ही जाणून घ्याल की मोबाइलमध्ये कोणते apps background मध्ये चालू आहे , आणि  ते किती   Ram वापरतय या बद्दल जाणून घ्याल .

    6)  USB Configuration -   या option चा  उपयोग म्हणजे तुम्ही जेव्हा  USB केबल connect कराल तेव्हा तुम्हाला फक्त मोबाईल charging व्हायला पाहिजे किंवा कनेक्ट केल्यावर फक्त फाईल किंवा फोल्डर दिसायला पाहिजे यांसारखे पर्याय यामध्ये असतात .

   7)  Allow mock location -   या option चा उपयोग म्हणजे  जर एखादे untrusted app तुमच्या कडून location मागत असेल तर या option ला activate करून तुम्ही तुमचे खरे location न दाखवता कुठलेही location set करू शकता .

   8) Aggressive Wi-Fi to Cellular Handover -    जर  तुम्ही एखादे wifi नेटवर्क वापरता वापरता त्याचे नेटवर्क week (कमी ) होते अशा वेळी automatic तुमच्या मोबाईल चा data on होईल . हा उपयोग आहे या option चा . तर हा option अशा वेळी कामे येईल जेव्हा तुम्ही एखादी movie किंवा एखादी मोठी फाईल डाऊनलोड करता आणि ते cancel व्हायला नको .

   9)  Show Touches -   याच्या नावावरुन आपण सहजपणे ओळखू शकतो की या option मुळे काय होइल .याला जर activet केल तर मोबाईल मध्ये आपण कूठे touch करतोय ते समजेल .
   10) Show surfhase update -     याला जर active केलं तर तुम्ही एखाद्या app वर किंवा settings वर swipe कराल तेव्हा तिथे तुम्हाला पूर्ण screen गुलाबी रंगाची होईल .

   11) Show Layout bounds -    या option ला active केल्यावर मोबाईल मध्ये प्रत्येक options च्या काठावर एक line तयार होईल .

    12) Force RTL Layout -    RTL म्हणजेच Right To Left , या option मध्ये थोडी गंमत आहे जर याला तुम्ही activet कराल तर मोबाईल मधले सर्व डाव्या बाजूचे अक्षरे (options ) उजव्या बाजूला दिसतील .आहे ना गंमत .

    13)  Window Animation  Scale -    या option चा उपयोग म्हणजे ..यामुळे तूम्ही तुमच्या मोबाईल च्या window animation चा स्पीड  कंट्रोल करु शकता .

    14) Transition scale -    या option च्या मदतीने तुम्ही जर एखादे app open करता तर त्या मध्ये जे transition दिसेल ते कीती लवकर open होते किंवा कीती उशिरा होते , ते या मध्ये समजते .

   15) Turn on 4xMSAA -    ज्या मित्रांना गेम्स खेळायला आवडते त्यांच्यासाठी हा option महत्वाचा आहे , याचा उपयोग म्हणजे याद्वारे तुम्ही मोबाईल मध्ये गेम performance किंवा गेम चे ग्राफिक वाढऊ शकता .

   16) Show CPU usage -    याच्या मदतीने तूम्ही पाहू शकता की , मोबाईल मध्ये  Ram कीती use होऊ राहीली किंवा battery किती use होतेय हे सर्व .

   17) Don't keep activity -    या ऑप्शन च्या मदतीने तुम्ही Resently use केलेले apps automatic kill (delete ) होतात . म्हणजेच जर एखादे app तुम्ही open केलेत जोपर्यंत तुम्ही त्या app  मध्ये आहात तोपर्यंत ते चालेल , त्या app च्या बाहेर आल्यावर म्हणजे मोबाईल च्या home screen वर आल्यावर ते app automatic बंद होईल .

   18) Show all ANRs -     हा option तसा महत्वपूर्णच आहे , याचा खास उपयोग म्हणजे याच्यामुळे आपण ओळखू शकू की कोणते apps hang होतेय आणि कोणते नाही . जर एखादे apps चालत नसेल किंवा hang होत असेल तर तिथे App not Responding  अशी एक सूचना येईल .

       तर मित्रांनो ही आहे Android developer option बद्दल ची माहिती आणि त्यांचे फायदे . 
 माहीती कशी वाटली , या बद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर खाली comment मध्ये जरूर लिहा .
    आणि मित्रांना shear करुन वाचायला सांगा ..


                       धन्यवाद  *
        

     * Good  Day *

No comments:

Android mobile मध्ये Screen lock / Pattern lock /Pin lock कसे लावावे ..? ?

  नमस्कार मित्रांनो,   आज च्या  या पोस्ट मध्ये  आपण  जाणुन घेणार आहोत की  screen lock /pattern  lock  किंवा pin lock  कसे  set करतात ... ...