Pages

Followers

Tuesday, 22 January 2019

VPN म्हणजे काय ? ? ? VPN चा उपयोग काय ...? ? ?

 

            मित्रांनो  आपण इंटरनेट चा वापर दिवसभर करत असतो ,  त्यामधे  आपण काही वेबसाईट search करतो ,  इंटरनेट द्वारे  काहीतरी शोधत राहतात , काही लोकं तर इंटरनेट द्वारे  काम करतात जसे की बँका मध्ये  online transaction होते , मोठमोठ्या कंपन्यांमध्ये खुप अशी कामे इंटरनेट द्वारे म्हणजेच online केली जातात , email पाठवणे , चाटिंग करणे यांसारखी .
तसेच आपण इंटरनेट द्वारे  movie किंवा musics download  करतो . किंवा एखाद्या वेबसाईट वर  sign in करण्यासाठी आपण आपली  personal detail देतो किंवा share करतो . अशा personal गोष्टी share करणे म्हणजे... थोडं   धोक्याचेच  असते नाही का ..कारण  आजच्या काळातऑनलाईन  इंटरनेट द्वारे  सुध्दा लूटमार होते . म्हणजेच काही जे Hackers  असतात ते  तुमची personal  details  चोरून  तुम्हाला blackmail करु  शकतात . कारण  Hackers  याच संधीची वाट पाहत असतात की केव्हा जरूरी डाटा चोरतो आणी  त्या बदल्यात  पैसे घेतो , असे काही Hackers असतात .
         पण या बदलत्या वेळा बरोबर इंटरनेट च्या सुरक्षितते च ध्यान ठेवलं जातय आणि या मध्ये काही बदल  होत आहेत . आजच्या या वेळात ऑनलाईन काम करतांना जी भीती वाटते त्या भीती पासून मुक्तता मिळवण्यासाठी एक उपाय म्हणजेच VPN ,
       या vpn बद्दल तुम्हाला थोडं फार माहीत असेलच किंवा काहींना नसेलही , कारण याचा कोणी फारसा उपयोगच करत नाही . याचा उपयोग न करण्याचे कारण म्हणजे याबद्दल अधिक माहीत नसणे ,
       तर   मित्रांनो ...आज या  पोस्ट मध्ये आपण जाणुन  घेणार आहोत .... VPN  काय आहे  ?  VPN चा  उपयोग काय ? ?  त्याच्या मुळे फायदा काय  ? VPN कशा प्रकारे काम करते ..?  अशा अनेक गोष्टी आज आपण समजुन घेणार आहोत .चला तर मग सुरवात करूया .


         *  VPN म्हणजे काय ..? 

       Virtual Private Network असा VPN चा पुर्ण अर्थ  होतो .VPN  ही एक नेटवर्कचीच पद्धत आहे जे Public नेटवर्क मध्ये  internet आणी private नेटवर्क Wi-fi  यांच्या मध्ये एक सुरक्षित कनेक्शन बनवते . VPN हे एक फ़ार मोठे साधन आहे  आपल्या नेटवर्कला  सुरक्षित बनविण्यासाठी . आणि आपला personal data  hackers पासून वाचविण्यासाठी .
खरे तर या vpn चा उपयोग gov. Agencis , शिक्षण संस्था , corporation तसेच online काम करणारे  लोकं करतात.यासाठी की आपला महत्वपुर्ण data कोणत्याही अज्ञात वक्तीच्या (Hackers) हाति लागु नये .
    एखादी व्यक्ती इंटरनेट चा वापर फक्त साध्या browsing साठी करते , ती व्यक्ती सुध्दा या vpn चा वापर करु शकते .
VPN सर्व प्रकारच्या डाटा ला सुरक्षित ठेवते , म्हणजे जे उपयोगी आहे ते पण आणि जे उपयोगी नाही ते पण .
    काही वेळा आपले सरकार  access restriction करते म्हणजेच काही वेबसाईट पर्यंत आपण पोहोचु शकत नाही ,
अशा वेळी browsing करणे फार कठीण होते . अशा वेळी आपल्याला अशा  तंत्रज्ञानाची  गरज असते जी आपली स्वतःची ओळख सुरक्षीत ठेऊ शकते .  आणि हे  शक्य होते ते या VPN च्या मदतीने . VPN  आपल्या identity ला  secure  आणि private  ठेवते . तसेच Restricted  वेबसाईट ला pass करुन घेते .

                   *  VPN चा  उपयोग (फायदा ) काय  ?  

        VPN चा  सर्वात मोठा फायदा  म्हणजे तुम्ही   internet वर  जे  काम कराल ते सुरक्षित राहील .तसेच ज्या वेबसाईट  प्रतिबंधित आहेत म्हणजेच काही  वेबसाईट अशा आहेत ज्या आपण आपल्या देशात access करु शकत नाहीत त्या वेबसाईट VPN च्या मदतीने आपण सहजपणे access करु शकतो .


                 *VPN  कशा प्रकारे  काम करते   ? 

          जेव्हा आपण आपल्या मोबाईल चे इंटरनेट    vpn  बरोबर  connect करतो  तेव्हा आपला मोबाईल एका स्थानिक नेटवर्क  सारखे  काम करतो  .आणि जि वेबसाईट आपल्या देशात  चालत नाही ती वेबसाईट vpn च्या मदतीने सहजपणे  open होते . म्हणजेच तेव्हा VPN आपले काम चालु करते , users च्या विनंतीला त्या block webside च्या serverकडे  घेऊन जाण्याचे काम  हे VPN करते . आपण आपल्या देशात राहुन जेव्हा एखाद्या दुसऱ्या देशाच्या VPN ला connect करतो तेव्हा हे काम होते .
       इथे एक उदाहरण देतो -   पहिले आपल्या भारतात नेटफ्लिक्स (Netflix) चालत नव्हते , आता चालते पण ज्या वेळेस चालत नवते तेव्हा आपल्याला ते पहायचे असते तर तेव्हा आपण काय केले असते , हेच की आपण भारतात राहुन त्या VPN कनेक्ट केले असते ज्याचा server समजा US मध्ये आहे ,  तेव्हा ते  कनेक्ट झाल्यावर आपण त्या  server च्या मदतीने  netflix आरामशीर पाहु शकतो . अशा वेळी मोठा फायदा म्हणजे , Netflix ला अजीबात कळणार नाही की हा user भारतामधुन पाहतोय . कारण त्यांना वाटतय की  हा user local नेटवर्क म्हणजेच US मध्येच आहे .

               या VPN चा उपयोग करण्यासाठी इंटरनेट वर  खुप सारे software  उपलब्ध आहेत . ते free मध्ये आणी  विकत सुद्धा घेता येतात . त्याचा उपयोग तुम्ही computer किंवा  smartfhone मध्ये करु शकता
 
          तर मित्रांनो अशा  प्रकारे  आपण या VPN service उपयोग  करु शकाल ..

     पण  क्रुपया याचा कोणीही गैर वापर  करु नका ... ही  विनंती आहे .
 

माहीती कशी वाटली  comment द्वारे जरूर कळवा ...
आणि मित्रांना share करुन  वाचायला सांगा ...

               *  धन्यवाद *
         
         Good  day

Android mobile मध्ये Screen lock / Pattern lock /Pin lock कसे लावावे ..? ?

  नमस्कार मित्रांनो,   आज च्या  या पोस्ट मध्ये  आपण  जाणुन घेणार आहोत की  screen lock /pattern  lock  किंवा pin lock  कसे  set करतात ... ...