नमस्कार मित्रांनो ...
अनेकदा मि लोकांकडुन ऐकलय कि, मोबाईल hang होतोय काय करावे, कसे करावे...??
त्यांना माहीत पण नसते की आपला मोबाईल hang कशामुळे होतोय, आणि त्याला hang होण्यापासून कसे थांबवावे.
मित्रांनो, जो पर्यंत आपण एखादी शंका निट समजुन घेत नाही तोपर्यंत त्यात सुधार करण्याचा विचारही करत नाही. आणि न समजता करायला गेले तर त्यात नुकसान झाल्या शिवाय राहणार नाही.
या पोस्ट मध्ये आपण android device hang का होतोय ? या बद्दल थोडक्यात जाणुन घेणार आहोत.
याची कारणे खाली दिल्याप्रमाणे असु शकतात, ती लक्षात घेउन तुम्ही मोबाईल hang होण्यापासुन वाचवु शकता.
* Mobile Hang होण्याची कारणे *
1) जास्त Applications install करून ठेवणे
तसे पाहीले तर सर्वच device मध्ये hang चा problem नाही दीसुन येत, पण काहि low budget phones आहेत त्यांमधे ही अडचण नेहमीच येते. त्याला हे पण एक कारण असु शकते. ते म्हणजे तुम्ही खुप सारे Apps install करून ठेवलेले असतील. कमी budget वाल्या smart phone मध्ये internal storage कमी असते. त्यामधे जर जास्त apps install करून ठेवले तर storage space कमी होईल. आणि जेव्हा space कमी होईल तेव्हा तुमच्या मोबाईल ची process automatic slow होईल आणि तुमच्या mobile चे काम करणे बंद होईल.
त्यासाठी जेवढे ऊपयोगाचे apps आसतिल तेवढेच ठेवा.
आणि जर जास्त apps ठेवायचेच असतिल तर त्यांना memory card मधे पण install करु शकता, आणि install केलेले apps move करू शकता. त्यामुळे तुमचे internal storage free राहिल.
2) RAM ची कमतरता/RAM कमी पडणे.
मोबाइल hang होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे RAM (Random Access Memory ) ची कमी असणे.
जेव्हा आपण एखादे apps open करतो/वापरतो तेव्हा त्यामधे RAM उपयोगात आणली जाते.
जर तुमच्या device ची RAM capacity कमी आहे आणि तुम्ही जास्त task (apps ) open करुन ठेवलेत, जसे की -sms, browser, music, downloader आणि अजुन काहि background मध्ये चालत असलेले ईतर apps या सर्वांना open करण्यासाठी RAM ची गरज असते.आणि तुम्हि जेव्हा पण जास्त apps एकाच वेळी open कराल तर memory कमी पडेल आणि तुमचा mobile hang होऊ शकतो.
त्यासाठी पहिले open केलेले apps बंद करा, नंतर दुसरे open करा.
3) Unknown sources App
कोणतेही Apps download करण्यासाठी आपण play store चा वापर करतो, आणि तुम्ही google play store मधून download केलेले कोणतेही apps हे certified आणि scanned केलेले असतात. म्हणजेच त्या apps मध्ये तुम्हाला कोणतिही Harmful files (हानिकारक फाईल) भेटणार नाही.
Unknown sources app म्हणजेच आपण एखाद्या वेब साईट मधुन किंवा ईतर दुसऱ्या कडुन घेतलेले apps. जेव्हा ते आपण Install करतो तेव्हा आपल्याला एक सुचना मिळते, की हे apps harmful असु शकते, पण तरीही ते आपण setting मध्ये जाऊन unknown source app Enable करून ते Install करतो, अशा apps मध्ये harm file असु शकतात जे mobile hang होण्याचे कारण होवु शकते
4)***** जेव्हा तुम्हाला Internet चालवायचे आहे तेव्हा Data on केल्या नंतर, थोड्या वेळा पर्यंत कोणतेही apps open करू नका, कारण data on केल्या नंतर अनेक process चालू होतात , जसे - facebook, whatsapp यांचे notification.. play store, hike यांचे notification. अशा अनेक apps ची process चालू असते. त्यातच तुम्ही दुसरे एखादे apps open केले तर system hang चालेल. त्यामुळे net चालू केल्यानंतर सर्व notification , व ईतर process पुर्ण होऊ द्या नंतर apos open करा .
5) जास्त वेळ वापर केल्याने
mobile जास्तीत जास्त वेळ continue वापरल्याने गरम (heat ) होऊन तो automatic restart होतो.
तसा तो normal use केल्याने नाही, पण तुम्ही जर जास्तीत जास्त वेळ games खेळताय downloading करताय, online video बघताय , wi-fi, hotspot चालवताय , अशा वेळी असे होऊ शकते.
तर मित्रांनो अशी काही कारणे असु शकतात, जी आपल्या मोबाईलला हँग करू शकतात.
हिच कारणे असतात असे नाही, दुसरी पण कारणे असु शकतात .
पण यांसारखे एखादे कारण आढळले तर तुम्ही ते नक्कीच solve कराल .
ही post वाचुन कशी वाटली .मनात काही शंका असतील तर coments द्वारे कळवा .
* धन्यवाद *
* Good Luck *