Pages

Followers

Tuesday, 13 August 2019

Android mobile मध्ये Screen lock / Pattern lock /Pin lock कसे लावावे ..? ?

  नमस्कार मित्रांनो,   आज च्या  या पोस्ट मध्ये  आपण  जाणुन घेणार आहोत की  screen lock /pattern  lock  किंवा pin lock  कसे  set करतात ...
       
          तसे पाहिले तर  बऱ्याच जणांना या  settings बद्दल  माहीतच असेल  , पण ज्यांना याची काही कल्पनाच नाही की screen lock  कसे  set करायचे  त्यांच्यासाठी ही पोस्ट  खुप  फायदेशीर राहील , चला तर मग सुरवात करुया .

      lock  सेट करण्याआधी आपण हा विचार करायचा की आपण  screen lock का सेट करतोय  कशासाठी करतोय  याचा काय फायदा होतोय आपल्याला ? कारण जर  तुम्ही screen lock टाकलंय आणी  त्याचा pattern  किंवा  pin  विसरलात तर ते  परत  खोलायला किंवा  शोधायला खुप त्रास होतो .म्हणून लॉक सेट करण्याआधी त्याचा pattern /pin / password  नीट लक्षात  ठेवा ..

              *     Screen lock का  set करावे ..? 
       
    आपल्याला  सर्वानाच  माहीत आहे की बिना lock चा  आपला  मोबाईल  कोणीही सहजपणे हाताळू  शकतात . काहींच्या  मोबाईल मधे  काही private  files ,  private  photos , pdf असे अनेक महत्वाचे  documents असतात .तर ते आपल्या शिवाय कोणीही सहजपणे पाहु नये किंवा हाताळू नये यासाठी screen lock चा  उपयोग होतो . 
        एखाद्या वेळेस तुम्ही घरातून मोबाईल न घेता तसेच बाहेर पडलात  तर तुम्हाला  वाटेल की  मोबाईल  कोणी  हाताळते की काय.पण तुम्ही screen lock केलं असल्यास जास्त विचार करायची गरज नाही , कारण तुमचा मोबाईल  सुरक्षित असेल .
    तर अशाच अनेक कारणामुळे  मोबाईल ला  screen lock  set करता येते .
  पण काही जणांना हे screen lock कसे सेट करावे हेच माहीत नसते , त्यांच्यासाठी ही पोस्ट खुप उपयोगी पडेल ...

      *  Screen Lock  कसे  करावे ..? ? 
    
       मित्रांनो  screen lock  सेट  करण्यासाठी खुपच सोपी पद्धत आहे ...
  सर्वप्रथम मोबाईलचा menu open करा  , त्यामध्ये settings मध्ये जा सेट्टिंग मधुन Security वर क्लिक करा
   खाली Image दाखवल्याप्रमाणे ...
     

Security मध्ये गेल्यानंतर  तुम्हाला screen lock चा  ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा खालील  प्रमाणे 



screen lock मध्ये गेल्यावर तुम्हाला lock ज्या पद्धतीने ठेवायचे आहे त्यांचे ऑप्शन तुम्हाला दिसतील ..यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीने lock निवडू शकता ...जसे -मी इथे  pattern lock निवडले आहे .



Pattern lock वर  क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही dots (टींब) दिसतील त्यांना एकत्र जोडुन तुमच्या मनासारखे drow /Pattern तयार करा जे तुमच्या नीट लक्षात राहील                                                                  
 एकदा जोडलेला pattern बरोबर आहे का याची खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा confirm वर क्लिक करुन परत जोडा आणि continue वर click करुन तुमच्या Pattern lock ची prosses पूर्ण करा .
  तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे pattern lock आपल्या मोबाईलला ठेऊ शकतो आणि आपल्या मोबाईल ची सुरक्षा करु शकतो ...याच प्रमाणे आपण पिन लॉक किंवा पासवर्ड lock सुध्दा ठेऊ शकतो .यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे एखादे नाव किंवा एखादा नंबर पण ठेऊ शकता पण तो लक्षात राहील असाच ठेवा ...


तर मित्रांनो  पोस्ट कशी वाटली कॉमेंट द्वारे जरूर कळवा ....आणि आपल्या मित्राना पण share करा ...


*   धन्यवाद   *

Good Day 

Tuesday, 22 January 2019

VPN म्हणजे काय ? ? ? VPN चा उपयोग काय ...? ? ?

 

            मित्रांनो  आपण इंटरनेट चा वापर दिवसभर करत असतो ,  त्यामधे  आपण काही वेबसाईट search करतो ,  इंटरनेट द्वारे  काहीतरी शोधत राहतात , काही लोकं तर इंटरनेट द्वारे  काम करतात जसे की बँका मध्ये  online transaction होते , मोठमोठ्या कंपन्यांमध्ये खुप अशी कामे इंटरनेट द्वारे म्हणजेच online केली जातात , email पाठवणे , चाटिंग करणे यांसारखी .
तसेच आपण इंटरनेट द्वारे  movie किंवा musics download  करतो . किंवा एखाद्या वेबसाईट वर  sign in करण्यासाठी आपण आपली  personal detail देतो किंवा share करतो . अशा personal गोष्टी share करणे म्हणजे... थोडं   धोक्याचेच  असते नाही का ..कारण  आजच्या काळातऑनलाईन  इंटरनेट द्वारे  सुध्दा लूटमार होते . म्हणजेच काही जे Hackers  असतात ते  तुमची personal  details  चोरून  तुम्हाला blackmail करु  शकतात . कारण  Hackers  याच संधीची वाट पाहत असतात की केव्हा जरूरी डाटा चोरतो आणी  त्या बदल्यात  पैसे घेतो , असे काही Hackers असतात .
         पण या बदलत्या वेळा बरोबर इंटरनेट च्या सुरक्षितते च ध्यान ठेवलं जातय आणि या मध्ये काही बदल  होत आहेत . आजच्या या वेळात ऑनलाईन काम करतांना जी भीती वाटते त्या भीती पासून मुक्तता मिळवण्यासाठी एक उपाय म्हणजेच VPN ,
       या vpn बद्दल तुम्हाला थोडं फार माहीत असेलच किंवा काहींना नसेलही , कारण याचा कोणी फारसा उपयोगच करत नाही . याचा उपयोग न करण्याचे कारण म्हणजे याबद्दल अधिक माहीत नसणे ,
       तर   मित्रांनो ...आज या  पोस्ट मध्ये आपण जाणुन  घेणार आहोत .... VPN  काय आहे  ?  VPN चा  उपयोग काय ? ?  त्याच्या मुळे फायदा काय  ? VPN कशा प्रकारे काम करते ..?  अशा अनेक गोष्टी आज आपण समजुन घेणार आहोत .चला तर मग सुरवात करूया .


         *  VPN म्हणजे काय ..? 

       Virtual Private Network असा VPN चा पुर्ण अर्थ  होतो .VPN  ही एक नेटवर्कचीच पद्धत आहे जे Public नेटवर्क मध्ये  internet आणी private नेटवर्क Wi-fi  यांच्या मध्ये एक सुरक्षित कनेक्शन बनवते . VPN हे एक फ़ार मोठे साधन आहे  आपल्या नेटवर्कला  सुरक्षित बनविण्यासाठी . आणि आपला personal data  hackers पासून वाचविण्यासाठी .
खरे तर या vpn चा उपयोग gov. Agencis , शिक्षण संस्था , corporation तसेच online काम करणारे  लोकं करतात.यासाठी की आपला महत्वपुर्ण data कोणत्याही अज्ञात वक्तीच्या (Hackers) हाति लागु नये .
    एखादी व्यक्ती इंटरनेट चा वापर फक्त साध्या browsing साठी करते , ती व्यक्ती सुध्दा या vpn चा वापर करु शकते .
VPN सर्व प्रकारच्या डाटा ला सुरक्षित ठेवते , म्हणजे जे उपयोगी आहे ते पण आणि जे उपयोगी नाही ते पण .
    काही वेळा आपले सरकार  access restriction करते म्हणजेच काही वेबसाईट पर्यंत आपण पोहोचु शकत नाही ,
अशा वेळी browsing करणे फार कठीण होते . अशा वेळी आपल्याला अशा  तंत्रज्ञानाची  गरज असते जी आपली स्वतःची ओळख सुरक्षीत ठेऊ शकते .  आणि हे  शक्य होते ते या VPN च्या मदतीने . VPN  आपल्या identity ला  secure  आणि private  ठेवते . तसेच Restricted  वेबसाईट ला pass करुन घेते .

                   *  VPN चा  उपयोग (फायदा ) काय  ?  

        VPN चा  सर्वात मोठा फायदा  म्हणजे तुम्ही   internet वर  जे  काम कराल ते सुरक्षित राहील .तसेच ज्या वेबसाईट  प्रतिबंधित आहेत म्हणजेच काही  वेबसाईट अशा आहेत ज्या आपण आपल्या देशात access करु शकत नाहीत त्या वेबसाईट VPN च्या मदतीने आपण सहजपणे access करु शकतो .


                 *VPN  कशा प्रकारे  काम करते   ? 

          जेव्हा आपण आपल्या मोबाईल चे इंटरनेट    vpn  बरोबर  connect करतो  तेव्हा आपला मोबाईल एका स्थानिक नेटवर्क  सारखे  काम करतो  .आणि जि वेबसाईट आपल्या देशात  चालत नाही ती वेबसाईट vpn च्या मदतीने सहजपणे  open होते . म्हणजेच तेव्हा VPN आपले काम चालु करते , users च्या विनंतीला त्या block webside च्या serverकडे  घेऊन जाण्याचे काम  हे VPN करते . आपण आपल्या देशात राहुन जेव्हा एखाद्या दुसऱ्या देशाच्या VPN ला connect करतो तेव्हा हे काम होते .
       इथे एक उदाहरण देतो -   पहिले आपल्या भारतात नेटफ्लिक्स (Netflix) चालत नव्हते , आता चालते पण ज्या वेळेस चालत नवते तेव्हा आपल्याला ते पहायचे असते तर तेव्हा आपण काय केले असते , हेच की आपण भारतात राहुन त्या VPN कनेक्ट केले असते ज्याचा server समजा US मध्ये आहे ,  तेव्हा ते  कनेक्ट झाल्यावर आपण त्या  server च्या मदतीने  netflix आरामशीर पाहु शकतो . अशा वेळी मोठा फायदा म्हणजे , Netflix ला अजीबात कळणार नाही की हा user भारतामधुन पाहतोय . कारण त्यांना वाटतय की  हा user local नेटवर्क म्हणजेच US मध्येच आहे .

               या VPN चा उपयोग करण्यासाठी इंटरनेट वर  खुप सारे software  उपलब्ध आहेत . ते free मध्ये आणी  विकत सुद्धा घेता येतात . त्याचा उपयोग तुम्ही computer किंवा  smartfhone मध्ये करु शकता
 
          तर मित्रांनो अशा  प्रकारे  आपण या VPN service उपयोग  करु शकाल ..

     पण  क्रुपया याचा कोणीही गैर वापर  करु नका ... ही  विनंती आहे .
 

माहीती कशी वाटली  comment द्वारे जरूर कळवा ...
आणि मित्रांना share करुन  वाचायला सांगा ...

               *  धन्यवाद *
         
         Good  day

Monday, 26 November 2018

कॉल बारिंग (Call Barring ) काय आहे ? ? (What is Call Barring...? in marathi )

             
मित्रांनो मोबाईल फोन च्या मध्ये असे अनेक काही फीचर्स आहेत त्या बद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल .
 असेच एक फीचर्स आहे ते म्हणजे कॉल बारिंग (Call barring ) या फीचर्स बद्दल माझ्या मते फारच कमी लोकांना माहीत असेल .तसे पाहिले तर हे फीचर्स फार महत्वाचेच  आहे , आणि हे फीचर्स जवळपास सर्वच फोन्स मध्ये उपलब्ध असते .
         तर आजच्या या पोस्ट मध्ये जाणुन घेऊया की call barring काय आहे  ? ते कशा प्रकारे use करावे ? आणि त्याचे फायदे काय आहेत ? ?
   
         पहिल्यांदा त्याचा फायदा काय ते पाहुया , ..
समजा आपला मोबाईल एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने घेतला  आणि तो त्याच्यावरून  सहजपणे कॉल करु शकतो , पण call barring जर active असेल तर तो आपल्या शिवाय कॉलच करु शकणार नाही .  कारण तो जेव्हा कॉल करेल तेव्हा तिथे password टाकावा लागेल , आणि तो फक्त आपल्यालाच माहित असेल .
  कधी कधी आपल्याला वाटते की आपल्या मोबाईल मध्ये फक्त इनकमिंग  कॉलच आले पाहिजे आउट गोईंग बंद पाहिजे .अशा वेळी call barring चा उपयोग होतो .
   एखाद्या वेळेस आपल्याला अनेक असे फालतू calls येतात किंवा एखादा call करून त्रास करत असेल तर या सर्व  येणाऱ्या calls ला तुम्ही ब्लॉक करु शकता .यां सारखे वापर call barring मुळे करता येतात
     
     कॉल बारिंग चा साधारण पणे अर्थ म्हणजेच कॉल थांबवणे , जर तुम्हाला वाटत असेल की कोणत्याही प्रकारचे आऊट गोईंग कॉल (outgoing calls ) block करायचे आहेत किंवा आपल्या फोन मधुन कोणीही इंटरनेशनल कॉल करु शकणार नाही या प्रकारचे कॉल ब्लॉक करायचे आहेत .तर हे तुम्ही call barring च्या मदतीने करु शकता .
      कॉल  बारिंगच्या मदतीने खालील गोष्टी करु शकता ...-

   १)    मोबाईल मध्ये सर्व outgoing  calls ब्लॉक करु शकता .

    २)  सर्व  incoming calls ब्लॉक करु शकता .

    ३)   सर्व  roaming calls ब्लॉक करु शकता .

    ४)    सर्व international calls ब्लॉक करु शकता .

    या सर्व गोष्टी होऊ शकतात .याचा उपयोग तर तुम्हाला समजलाच असेल ,
 आता याला चालु किंवा बंद कसे करावे ते पाहुया ,

          =>   Call barring  ला  Activete/Deactivate कसे करावे ? ? 

 कॉल बारिंग activete करण्यासाठी किंवा deactivate करण्यासाठी सर्वप्रथम फोन च्या सेट्टिंग मध्ये जावे .
phone  setting open केल्यावर call barring चा option दिसेल त्यावर क्लिक करावे .


 
       Call barring open झाल्यावर  त्यामध्ये अनेक पर्याय येतील त्याच्यातील तुम्हाला जे ब्लॉक करायचे आहे त्यावर क्लिक करावे .



एखाद्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तिथे तुमच्या कडून एक कोड मागितला जाईल तो कोड नंबर टाकायचा आहे ,  कोड नंबर साठी तुम्ही तुमच्या नेटवर्क ऑपरेटर ला सम्पर्क साधावा .
     
        deactivate करण्यासाठी याच पद्धतीने जाऊन  Cancel All या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर सर्व  Request cancel होतील .

                          अशा  पद्धतीने तुम्ही call barring सेवा activet किंवा deactivate करु शकता .

                                                   *     धन्यवाद *

 या बद्दल काही प्रतिक्रिया असतील तर जरूर कळवा ...

Android mobile मध्ये Screen lock / Pattern lock /Pin lock कसे लावावे ..? ?

  नमस्कार मित्रांनो,   आज च्या  या पोस्ट मध्ये  आपण  जाणुन घेणार आहोत की  screen lock /pattern  lock  किंवा pin lock  कसे  set करतात ... ...