Pages

Followers

Friday, 3 August 2018

Android mobile Hang का होतोय ?? (Android mobile Hanging ? in marathi)



नमस्कार मित्रांनो ...
   अनेकदा मि लोकांकडुन ऐकलय कि, मोबाईल hang होतोय काय करावे, कसे करावे...??
   त्यांना माहीत पण नसते की आपला मोबाईल hang कशामुळे होतोय, आणि त्याला hang होण्यापासून कसे थांबवावे.
  मित्रांनो, जो पर्यंत आपण एखादी शंका निट समजुन घेत नाही तोपर्यंत त्यात सुधार करण्याचा विचारही करत नाही. आणि न समजता करायला गेले तर त्यात नुकसान झाल्या शिवाय राहणार नाही.
   या पोस्ट मध्ये आपण android device hang का होतोय ? या बद्दल थोडक्यात जाणुन घेणार आहोत.
   याची कारणे खाली दिल्याप्रमाणे असु शकतात, ती लक्षात घेउन तुम्ही मोबाईल hang होण्यापासुन वाचवु शकता.

          * Mobile Hang होण्याची कारणे  *
  1)   जास्त Applications install करून ठेवणे
        तसे पाहीले तर सर्वच device मध्ये hang चा problem नाही दीसुन येत, पण काहि low budget phones आहेत त्यांमधे ही अडचण नेहमीच येते. त्याला हे पण एक कारण असु शकते. ते म्हणजे तुम्ही खुप सारे Apps install करून ठेवलेले असतील. कमी budget वाल्या smart phone मध्ये internal storage कमी असते. त्यामधे जर जास्त apps install  करून ठेवले तर storage space कमी होईल. आणि जेव्हा space कमी होईल तेव्हा तुमच्या मोबाईल ची process automatic slow होईल आणि तुमच्या mobile चे काम करणे बंद होईल.
   त्यासाठी जेवढे ऊपयोगाचे apps आसतिल तेवढेच ठेवा.
  आणि जर जास्त apps ठेवायचेच असतिल तर त्यांना memory card मधे पण install करु शकता,  आणि install केलेले  apps move करू शकता. त्यामुळे तुमचे internal storage free राहिल.

  2)   RAM ची कमतरता/RAM कमी पडणे.
        मोबाइल hang होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे RAM (Random Access Memory ) ची कमी असणे.
     जेव्हा आपण एखादे apps open करतो/वापरतो तेव्हा त्यामधे RAM उपयोगात आणली जाते.
 जर तुमच्या   device ची RAM capacity कमी आहे आणि तुम्ही जास्त task (apps ) open करुन ठेवलेत, जसे की -sms, browser, music, downloader आणि अजुन काहि background मध्ये चालत असलेले ईतर apps या  सर्वांना open करण्यासाठी RAM ची गरज असते.आणि तुम्हि जेव्हा पण जास्त apps एकाच वेळी open कराल तर memory कमी पडेल आणि तुमचा mobile hang होऊ शकतो.
      त्यासाठी पहिले open केलेले apps बंद करा, नंतर दुसरे open करा.

3)      Unknown sources App
    कोणतेही Apps download करण्यासाठी आपण play store चा वापर करतो, आणि तुम्ही google play store मधून  download केलेले कोणतेही apps हे certified आणि scanned केलेले असतात. म्हणजेच त्या apps मध्ये तुम्हाला कोणतिही Harmful files (हानिकारक फाईल) भेटणार नाही.
    Unknown sources app म्हणजेच आपण एखाद्या वेब साईट मधुन किंवा ईतर दुसऱ्या कडुन घेतलेले apps. जेव्हा ते आपण Install करतो तेव्हा आपल्याला एक सुचना मिळते, की हे apps harmful असु शकते, पण तरीही ते आपण setting मध्ये जाऊन    unknown source app Enable करून ते Install करतो, अशा apps मध्ये harm file असु शकतात जे mobile  hang  होण्याचे कारण होवु शकते

   4)***** जेव्हा तुम्हाला Internet चालवायचे आहे तेव्हा Data on केल्या नंतर, थोड्या वेळा पर्यंत कोणतेही  apps open करू नका, कारण data on केल्या नंतर अनेक process चालू होतात , जसे - facebook,  whatsapp यांचे  notification.. play store,  hike यांचे notification. अशा अनेक apps ची process चालू असते. त्यातच तुम्ही दुसरे एखादे apps open केले तर system    hang चालेल. त्यामुळे  net चालू केल्यानंतर सर्व notification , व  ईतर process पुर्ण   होऊ द्या नंतर apos open  करा .

  5)    जास्त वेळ वापर केल्याने
        mobile जास्तीत जास्त वेळ continue वापरल्याने गरम (heat ) होऊन तो automatic restart होतो.
तसा तो normal use केल्याने नाही, पण तुम्ही जर जास्तीत जास्त वेळ games खेळताय downloading करताय,  online video बघताय ,  wi-fi, hotspot चालवताय , अशा वेळी असे होऊ शकते.


         तर  मित्रांनो अशी काही कारणे असु शकतात, जी आपल्या मोबाईलला हँग करू शकतात.
  हिच कारणे असतात असे नाही, दुसरी पण कारणे असु शकतात .
   पण यांसारखे एखादे कारण आढळले तर तुम्ही ते नक्कीच solve कराल .



   ही post वाचुन कशी वाटली .मनात काही शंका असतील तर coments द्वारे कळवा .
   


                 * धन्यवाद *

   * Good Luck *

Sunday, 27 May 2018

Android mobile ला Password/pattern शिवाय कसे unlock करावे ?

    मित्रांनो जर तूम्ही तुमच्या मोबाईल ला टाकलेला password किंवा pattern विसरलात .तर तुमच्या मनात अनेक प्रश्न येतील की आता काय होईल, आपला मोबाईल unlock होईल की नाही,आता काय करु?, कुठे जाऊ ?असे अनेक प्रश्न येतील, पण यात घाबरून जाण्याचे कारण नाही, मी आज तुम्हाला या पोस्ट मध्ये या बद्दलच सांगणार आहे की, password /pattern किंवा pin नंबर विसरल्यावर मोबाइल unlock कसा करायचा. तर कृपया लक्ष देऊन वाचत रहा.
     मित्रांनो मोबाईल चा password किंवा pattern विसरल्यावर तुम्हि मोबाईलचे lock तोडू शकता,ते पण घरि बसल्या बसल्या, तुम्हाला कुठल्याही mobile shop मध्ये जायची गरज नाही.आणि कोणाला पैसेही द्यायचि गरज नाही. काही लोक Password किंवा pattern coad विसरल्यावर सरळ मोबाईल घेऊन mobile shop मधे जातात. तिथे गेल्यावर दुकानदाराला 200-250 रू. देउन मोबाईल चे lock ऊघडता. पण एक गोष्ट लक्षातठेवा मित्रांनो, दुकानदार  सुद्धा हीच पद्धत वापरतो जी मी आज तुम्हाला सांगणार आहे.
   या पद्धति मध्ये कोणत्याही Tools(software) चि किंवा computer चि गरज पडत नाहि
 हि एक    simple trick आहे आणि ते कोणीही  करू शकेल.
  चला तर मग बघुया कसे करायचे...
    * Password शिवाय mobile unlock कसा करावा *
मित्रांनो , mobile unlock करण्यासाठी आपल्याला मोबाईलला Hard reset/Factory Reset करावे लागेल.....!!! आता तुम्ही विचार कराल की, मोबाईल चे lock तर उघडत नाही आणि reset कसा करणार,,, , !!  मित्रानो हीच तर खरी trick आहे. यामध्ये तुम्ही मोबाईलचे lock न खोलता phone reset करु शकता आणि password तोडू शकता.
     खाली दीलेल्या पद्धती नुसार mobile reset करता येतो.

  १)   सर्वात पहिले आपल्या मोबाईलला  switch off करा.
  २)   तुम्हाला वाटत असेल तर sim card आणि memory cards काढुन ठेवु शकता.
  ३)   switch off केल्यानंतर power on -off बटण आणि volume down बटण दोन्ही एकाच वेळी         दाबुन ठेवा. मोबाईल चालु होई पर्यंत.
              काहि Mobiles ला तिन बटन दाबायचे असतात.. power on -off + volume + Home             key ही सर्व buttons एकाच वेळी दाबुन ठेवा.
   4)    मोबाईल चालू झाल्यावर तुम्हाला Android system recovery page .... open झालेले दीसेल.
          फोटो पाहा...


             आता या page वर wipe data /Factory Reset असा पर्याय असेल तिथे  click करा. पण त्या आधी  एक गोष्ट लक्षात ठेवा, या mode मध्ये screen  touch चालणार नाही, त्यामुळे प्रयत्नहि करु नका. त्यासाठी volume बटण आणि power on off बटण यांचा उपयोग करा. जसे- खाली- वर करण्यासाठी volume up -down बटण आणि select करण्यासाठी power on off बटण.
   5)     wipe data / factory reset वर click   केल्यावर तुमचा मोबाईल automatic reset होऊन चालू होईल
    अशा पद्धतिने तुमचे न खोलणारे lock खोलले गेलेले असेल.आणि आता तुम्ही नविन lock set करू शकता. lock set केल्यावर  password नीट ध्यानात ठेवा, ध्यानात राहात नसेल तर कुठेतर सुरक्षीत लिहुन ठेवा.


       * महत्वाची सुचना * (Important Notice ) *

    ही पद्धत वापरतांना तुमच्या मोबाईल मधला पूर्ण DATA Delete होईल, जसे की- तुम्ही मोबाईल मधे Install केलेले apps , फोन मेमोरी मध्ये Save केलेले photos, Songs , video , contact , pdf file वैगरे सर्व delete होतील. याची नोंद ठेवा .
    पण मेमोरी कार्ड (sd card ) आणि Sim card यांना काहीही होणार नाही. ते पुर्ण सुरक्षीत राहतील.


      तर मित्रांनो अशा पद्धतिने तुम्ही विसरलेले password किंवा pattern lock सहजपणे तोडू शकता.
ही trick कशी वाटलि आणि या trick बद्दल मनात काही शंका असतिल तर comment करुन जरुर कळवा.
   आणि मित्रांना पण   share  करुन वाचायला सांगा.


                     *  धन्यवाद *
      * Good  luck  *

Sunday, 13 May 2018

Android mobile मध्ये Speed Dial कसे सेट करावे??(How to set Speed Dial in Android fhone..? in marathi),

   मित्रांनो कदाचित तुम्हाला माहितही नसेल तुम्ही वापरत असलेल्या android fhone मध्ये असे नविन नविन फिचर्स येत राहतात, जे कल्पनेच्या पलिकडे असतात. अाताच्या काळात लोक जास्तित जास्त smartfhone चाच वापर करतात. यामध्ये असे काहि फिचर्स असतात जे अापल्याला माहित पण नसतात, यामध्येच एक speed dial ची सुविधा दीलेलि असते, हि सुविधा जवळपास सर्व android fhones मधे उपलब्ध असते. तर चला मग अाज अापण जाणुन घेवुया speed dial सेट कसे करायचे ते..
        कीत्तेक लोकांना अजुन माहित नाही, की speed dial अाहे तरी काय, याचा उपयोग काय,असे अनेक प्रश्न पडत असतील. तर ज्यांना याबद्दल माहीत नाहि त्याच्यासाठी हि पोस्ट खुप ऊपयोगी पडेल त्यासाठी शेवट पर्यंत वाचत राहा. तसेच सर्व mobile users साठी speed dial ची सुविधा खुप उपयोगाचि अाहे.
          * Speed Dial म्हणजे काय ?
     मित्रांनो तुमच्याकडे असे काहि contact नंबर असतील ज्यांना तुम्ही सतत call करत असाल, अाणि यांना काॅल करायचा असेल तेव्हा तुम्ही contact लिस्ट कींवा काॅल लिस्ट मध्ये जावुन तो नाव/नंबर शोधनार मग call करणार . तर हे न करता तुम्ही मात्र एकच नंबर press करुन call करु शकता यालाच Speed Dial म्हणतात.
      यामध्ये अापला वेळ पण वाचतो अाणि लवकर calling पण करु शकतो. तर तुम्हाला अाता समजले असेलच कि speed dial काय अाहे ते, अाता ते set कसे करायचे हे आपण पाहुया.

    * SPEED Dial कसे Set करावे *
    जवळजवळ सर्व Android fhones मधे Speed dial सेट करण्याची पद्धत सारखीच असते, पण ते थोडे फार ईकडे तिकडे असु शकते. 
   या पोस्ट मध्ये मी Samsung gaIaxy note 3 या मोबाईल ची प्रोसेस सांगितली आहे. 
  तर सर्वात पहिले मोबाईल मध्ये dialer ओपन करा .नंतर खाली Option ( ⚎ ) वर क्लिक करा. जसे खालील फोटो मध्ये दाखविल्या प्रमाणे. 
     
 


  दुसर्‍या नंबर ला Speed Dial Setting चा पर्याय दिसेल . खालील फोटो प्रमाणे..याला सिलेक्ट करा


     या नंतर 1 ते 9 नंबर पर्यंत स्पीड डायल सेट करण्याचा पर्याय येईल. तुम्हाला ज्या नंबर वर स्पीड डायल सेट करायचे आहे त्याच्यावर क्लिक करा. 

    CONTACT लिस्ट Open झाल्यावर तुम्हाला पाहिजे ते नंबर SeIect करु शकता. 


  सिलेक्ट केलेले Contact तुमच्या स्पीड डायल मध्ये add झालेले असतील. अशा प्रकारे तुम्ही 1 ते 9 नंबरा पर्यंत वेगवेगळे Contact Add करु शकता.

    * कसे वापरावे Speed Dial ?? *  
   Speed Dial सेट केल्या नंतर तुम्ही एक प्रकारे Fast CaIling करु शकता. त्यासाठी DiIer Open करा आणि ज्या नंबर वर Contact add केलेला आहे त्या नंबरला थोडा वेळ (2-3 /sec) दाबुन ठेवा, सेट केलेल्या Contact वर CaIIing होणे चालु होईल. 
    अशा प्रकारे तुम्ही ज्या ज्या नंबर वर स्पीड डायल सेट कराल त्या नंबरला LONG PRESS करुन call करु शकाल. याचा फायदा म्हणजे यामध्ये अापला वेळ पण वाचतो अाणि एखाद्या कठीण प्रसंगात तुम्हाला पटकन CaIl करायचा  असल्यास Speed DiaI ची सुविधा खुप उपयोगाचि अाहे.

         मित्रांनो जर असे फिचर्स आपल्या मोबाईलवर मुफ्त (FREE) मध्ये उपलब्ध आहेत तर   यांचा उपयोग केलाच पाहीजे
       * speed Dial कसे काढावेे? * 
जर तुम्हाला एखादा नंबर speed dial मधुन काढायचा असेल,कींवा त्याला दुसर्‍या नंबर वर set करायचे असेल तर ते पण करु शकता, Dialer open करुन speed dial मधेे जा,तिथेे add केलेले सर्व नंबर दिसतिल, option वर click करुन remove वर क्लिक करा.

जे नंबर काढायचे अााहेत,त्यांना मार्क करा आणि
Done वर 
Click
करा़



 असे करून speed dial मधुन contact remove होतील. अशा प्रकारे तुम्ही contact add आणि remove करू शकता, 
मित्रांनो तुम्हाला समजले असेलच, speed dial काय आहे? आणि ते कसे set करायचे ,,
 पोस्ट  कशी वाटली ते जरुर सांगा, मनात काही शंका असल्यास जरुर कळवा.
   शेअर आणि कमेंट करायला विसरु नका...

      * धन्यवाद *

Android mobile मध्ये Screen lock / Pattern lock /Pin lock कसे लावावे ..? ?

  नमस्कार मित्रांनो,   आज च्या  या पोस्ट मध्ये  आपण  जाणुन घेणार आहोत की  screen lock /pattern  lock  किंवा pin lock  कसे  set करतात ... ...