Pages

Followers

Saturday, 7 April 2018

Android Mobile ला अपडेट(Update) कसे करावे..? (How to Updates Android mobile...? in marathi )




नमस्कार मित्रांनो...

   अाज अापण बोलणार अाहोत अापल्या android fhone ला Update करण्याबद्दल, तुम्हाला वाटल असेल की update म्हणजे काय ? तर update म्हणजे , तुमच्या मोबाईल मध्ये जे version (अावृत्ती) अाहे त्या version पेक्षा एखादी सुधारीत अावृत्ती (letest version) अाले, तर अापली मोबाईल कंपनी अापल्या handset वर Letest software update पाठवुन देते. ते अापल्याला Download करुन install करायचे असते, यालाच update करणे म्हणतात.
    तर हे अपडेट कसे करावे, ते मी तुम्हाला सवीस्तर पणे सांगणार अाहे. तर कृपया ही पोस्ट शेवट पर्यंत नीट लक्ष देवुन वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल की android update कसा करायचा असतो , मग ते तुम्ही सहजपणे करु शकाल. तर जाणुन घेवुया ....
   जर अापल्या मोबाईल मध्ये update येत राहीले तर अापला मोबाईल अधीक सुरक्षित राहतो. अाणि मोबाईल मध्ये काही ना कही नवीन features add होत राहतील,पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रतेक मोबाईल कंपनी अपडेट पाठवत नाही. अशा काहीशा मोबाईल कंपण्या अाहेत ज्या अापल्याला अपडेट पाठवतात, जसे- Samsung, oppo, vivo, Google pixel, Lenevo, micromax, redmi ई...
   काही लोकांना तर हे पण माहीत नाही, की update काय अाहे, अाणी ते येते कसे, 
 अापल्या फोन मध्ये अपडेट अाहे की नाही, अाणि त्याला install कसे करायचे, हे अापण या पोस्ट मध्ये जाणुन घेऊया.

  * Android अपडेट कसे तपासावे?(how to check Android Updates ?)

   android फोन मध्ये update check करण्याच्या खालीलप्रमाणे दोन पद्धती अाहेत,
  पहीली पध्दत म्हणजे- सुरवातीला अापल्या मोबाईलच्या " Settings "मध्ये जावे,
  => तीथे "About phone" वर क्लिक करावे,
 => काही पर्याय (Options) दीसतील, त्यामध्ये 
     "system update/software update "वर
      क्लिक करावे,
  => त्यानंतर तुमचा मोबाईल update check करण्यास सुरवात होईल,त्या साठी Net connection चालु असले पाहीजे,
   => update उपलब्ध नसेल तर,या प्रकारे दाखवेल"your device software is up to date".
   => अाणि update उपलब्ध असेल तर, या प्रकारे दाखवेल "Update Available/New Update Available" 
  याचाच अर्थ तुमच्या मोबाईलला अपडेट अालेले अाहे. अाणि त्याच बरोबर Download साठीचा पर्याय पण असतोच.
     अपडेट करण्याची दुसरी पद्धत म्हणजे, *#*#2432546#*#* हा कोड नंबर टाकुन Call बटन दाबा. जर फोन ला अपडेट अाहे तर, Notification दाखवेल,ज्याच्यावर क्लीक केल्यावर download चालु होईल.
    मोबाईला update available अाहे की नाही हे तपासल्यावर, तो download & install करण्याअाधी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, कारण छोट्याशा कारणामुळे तुमचा मोबाईल अपडेट होउ शकणार नाही,
 त्यासाठी खाली दीलेल्या गोष्टी लक्षात ठेवा..
  *Full charge Battery
   android phone update  करण्याअाधी मोबाईलची बॅटरी कमीत कमी 70-80 % चार्जींग करावी.जास्त केली तर चांगलेच अाहे, कारण update करण्यासाठी जास्त वेळ पण लागु शकतो. अपडेट साठी अालेली file 1 GB पर्यंतची असु शकते. जर अपडेट करतांना मोबाईल switch off झाला तर problem येऊ शकतो, अाणि android software खराब(corrupt) पण होऊ शकतो.
   *अपडेट साठी wifi Network चा वापर करावा
   मी ईथे सांगु ईच्छीतो की, mobile network(sim network) द्वारे अपडेट करणे हे पुर्णपणे सुरक्षीत नाही,कारण mobile network चा स्पिड कमी जास्त होतो, अाणि कधी अचानक बंद पडते., तर कधी data संपुन जातो. म्हणुन ईथे मी wifi network  वापरण्याचा सल्ला देतोय. wifi ला स्पीड पण असतो अाणि data संपायची भीती पण नाही. पण जर तुम्हाला mobile network वर पुर्ण वीश्वास असेल तर तुम्ही mobile network बिंधास्त वापरु शकता.
   *फोन चा Backup घ्या
   अपडेट करतांना तुमच्या मोबाईल मधला data कींवा जरुरी असलेल्या फाईल्स मेमोरी कार्ड कींवा computer मध्ये save करुन घ्या,कारण अपडेट करतांना file/data lose(delet) होऊ शकतो. असेहोत नाही पण अचानक पणे झाले तर सर्व delet होईल म्हणुन फोन ला backup करा. 
    मित्रांनो मोबाईल अपडेट करण्या अगोदर वरील सर्व माहीती लक्षात ठेवा,अाणि मग मोबाईल अपडेट ला सुरवात करा.
    अाता अापण वळुया main topic कडे.
*Android phone अपडेट(Update) करणे.
    Android mobile update करण्यासाठी सर्वप्रथम wifi द्वारे ईंटरनेट ला connect करा,किंवा mobile Data on करा.
  => नंतर मोबाईलच्या "Settings" मध्ये या 
  => settings मध्ये अाल्यावर "About phone" वर click करा.
  => "software update" चा option असेल तीथे click करा
  => त्यामध्ये Download & Install वर click करा.
  => update Download होने चालु होईल.Download चालु असतांना mobile data किंवा wifi Disconect(बंद) करु नये.
  => Download  झाल्या नंतर तुमचा मोबाईल Automatic Restart होईल.
   या प्रकारे तुमचा android phone  Update होईल, अाणि एका नवीन version मध्ये बदल होईल.
    *Update करण्याचे फायदे
मोबाईल अपडेट केल्यानंतर असे काही बदल होतात,खालीलप्रमाणे..
  => तुम्ही एक letest Android version वापरु शकाल.
  => नवीन shortcut features येतील.
  =>installation performance चांगले होईल.
  =>Developer active मुळे फायदा होईल.
  =>ईंटरनेट performance चांगला मीळेल.
  =>Battery performance चांगला राहील.
  => other costomise features चा फायदा
  => old Bugs problem दुर होतील,अाणि अजुन खुप काही होऊ शकेल.
     *अपडेट न होण्याची कारणे
    
     जर मोबाईल अपडेट होत नसेल, तर त्याला काही कारणे अाहेत,ती म्हणजे तुमचा Android phone corrupted झाला असेल. दुसरे कारण म्हणजे तुमच्या android device ला तुमच्या मोबाईलच्या कंपनी कडुन update  उपलब्ध नसेल.
तीसेरे कारण म्हणजे तुमच्या android phone ला Root केले असेल तर मोबाईल अपडेट होत नाही.
         तर मित्रांनो, ही पोस्ट वाचुन तुम्हाला अाता समजले असेलच,की android phone ला  update कसे करायचे. तर तुम्ही ते सहजपणे करु शकता.
   

           तर मग ही माहीती /पोस्ट कशी वाटली मीत्रांनो, या बद्दल तुम्हाला काय वाटते, तुमच्या प्रतीक्रीया जरुर कळवा comment (टिप्पणि) द्वारे, अाणि अापल्या मित्रांना जरुर share (शेअर) करा...
           *धन्यवाद *
       Have A Good Day..

Saturday, 31 March 2018

Android च्या अावृत्यांची(versions) माहिती....

नमस्कार मित्रांनो... 
      पुन्हा एकदा तुमचे स्वागत अाहे. पहिल्या पोस्ट मध्ये सांगितल्या प्रमाणे मी या पोस्ट मध्ये तुम्हाला android versions बद्दल माहीती सांगणार अाहे.तर सुरवात करुया...
             android fhones हे वेगवेगळ्या अावृत्त्यांमधे (versions) नीर्माण केले गेलेत ,अाणि त्यांना विशीष्ट अशी नावे ,नंबर देण्यात अाले अाहेत.जसे-lolipop, Marshmallow,  Nougat अशी  नावे अाहेत. हे ते versions अाहेत ज्यांना android ने उपयोगात अाणले अाहेत. असेच काही versions अापण वापरत अालो अाणी अजुनही वापरतो अाहोत. 
   खाली दीलेल्या android OS च्या वेगवेगळ्या अावृत्त्यांची (versions) माहीती अापण थोडक्यात ..पण सविस्तर जाणुन घेऊया.
  Android 1.0 Alpha
  Android 1.1 Beta 
  Android 1.5 Cupcake
  Android 1.6 Donut
  Android 2.1 Eclair
  Android 2.2 Froyo
  Android 2.3 Gingerbread
  Android 3.0 Honeycomb
  Android 4.0 Icecream sandwich
  Android 4.1,2,3 Jelly Bean
  Android 4.4 Kitkat
  Android 5.0,1 Lollipop
  Android 6.0 Marshmallow
  Android 7.0, 1 Nougat
  Android 8.0 Oreo
      अाता मी तुम्हाला Android OS च्या वेगवेगळ्या versions(अावृत्त्यां)बद्दल सांगणार अाहे .ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की android ने काय काय बदलाव केलेत.
 *Android 1.0 Alpha
ही सर्वात पहीली व्यावसायिक आवृत्ती (commercial version) होती, जीला २३ सप्टेंबर २००८ साली प्रसिध्द केले गेले. याच्यामध्ये खुप सारी वैशिष्ट्ये (features) होती जसे- android market application, web browser, zoom अाणि plan full HTML अाणि XHTML ,cameras support, access to web email servers, gmail,google contact, web pages,calender, maps, google search, google talk, wifi, youtube, google sync ईत्यादी...

  *Android 1. 1 Beta

     या अावृतीला ९ फेब्रुवारी २००९ मध्ये प्रसिध्द केल गेल. या मध्ये longer in call screen timeout ची सुवीधा  होती. जेव्हा तुम्ही स्पीकर फोन चा वापर करता त्याच वेळेस याच्यात messages attach ments ला सेव्ह करण्याची सुवीधा होती.
   या अावृत्तीला petit four नावाने सुध्दा ओळखले जाते.

  *Android 1.5 CupCake     


      android 1.5 ही अावृत्ती Linux kernel 2.6.27 वर अाधारीत अाहे. तीला ३० एप्रील २००९ मध्ये प्रसिध्द केलं. ही पहीलि अशी अावृती(version)होती जीचे नाव एका मिठाई(dessert) वर अाधारीत होते. या अावृत्ती मध्ये अशा सुवीधा होत्या, जसे की support for widgets, video recordong playback, animeted screen, third party vitual keyboard ईत्यादी अनेक सुवीधा होत्या. त्याच बरोबर याच्यामध्ये तुम्ही picasa मध्ये फोटो अाणि youtube मध्ये video अपलोड करु शकता.
  *Android 1.6 Donut
    ही अावृत्ती Linux kernel 2.6.29 वर अाधारीत अाहे .हीला १५ सप्टेंबर २००९ मध्ये प्रदर्शीत केले.या अावृत्ती असे खुप सारे features असे होते जसे की, multi language speech, synthesis, camera, camcorder, gallery ईत्यादी. त्याच बरोबर screen resolutions पण सपोर्ट करत होते.
  *Android 2.1 Eclair
  २६ अाक्टोबर २००९ ला प्रसीध्द केलेली ही अावृती Linux kernel 2.6.29 वर अाधारीत होती. याच्यामध्ये काही बदलाव करण्यात अाले.जसे expanded account sync, Exchange Email support, Bluetooth 2.1 support, search all saved sms अाणि  mms ची सुविधा होती. त्याच बरोबर नवीन camera fratures, improved typing speed for virtual keyboard,सुधारीत google map 3.1.2 ईत्यादि.तसेच contact photo वर tap करुन तुम्ही कोणालाही call, sms किंवा  Email करु शकत होते.
  *Android 2.2 Froyo 
     froyo चा अर्थ म्हणजे Frozen Yogurt असे. या अावृत्तीला २० मे २०१० ला release केले. ही अावृत्ती Linux kernel 2.6.32 वर अाधारीत अाहे. याच्यामध्ये अतिरिक्त वैशिष्ट्ये होती ती म्हणजे,integration of chrome's vs java script engine into the browser application, सुधारीत app launcher, wi fi hot spot,सुधारीत microsoft Exchange support,quick switching multiple keyboards ईत्यादी.
  *Android 2.3 Gingerbread
     linux kernel 2.6.35 वर अाधारीत असलेली ही अावृत्ती ६ डीसेंबर २०१० साली प्रदर्शीत केली. यामध्ये extra larg screen size, copy and paste functionality, new download manager, fast text input for virtual keyboard, support for near field Communication ईत्यादी सुविधा अाहेत.त्याच बरोबर ईतर अनेक सुविधा पण अाहेत.
  *Android 3.0 Honeycomb
    android 3.0 या अावृत्तीला २२ फेब्रुवारी मध्ये releaseकेले. ही अावृत्ती linux kernel 2.6.36 वर अाधारीत अाहे. यामध्ये नवीन virtual अाणि holographic user interface च्या बरोबरच  added system bar,Redesigned keyboard पण जोडलेले अाहे,तसेच यामध्ये provides quick access to the camera, multitasking allow, multiply browser Tabs अाणि google talk चा वापर करुन video chat सारख्या सुविधा अाहेत.
  *Android 4.0 Icecream Sandwich
   या अावृत्तीला १९ अाक्टोंबर २०११ ला सार्वजनीक पणे जाहीर करण्यात अाले. याचा सांकेतीक शब्द (source code) १४ नोव्हेंबर २०११ ला उपलब्ध केला गेला. या अावृत्ती मध्ये तुम्ही प्रतेक नविन tab वर widgets चे वीभाजन करु शकता, screen shot capture, better voice integration, face unlock या सारख्या सुवीधा, तसेच या मध्ये तुम्ही सहजपणे फोल्डर बनवु शकता. कोणतेही launcher घेऊ शकता, copy and paste मध्ये अधिक सुधारणा, photo editor, camera मध्ये नविन सुधारणा, या सारख्या खुप सार्‍या सुविधा अाहेत.
  *Android 4.1 Jelly Bean
   linux kernel 3.0.31 वर अाधारीत असलेली ही अावृती २७ जुन २०१२ मध्ये प्रसिध्द केली.या अावृत्तीचा मुख्य उद्देश हा होता की वापरकर्त्याचि कार्यक्षमता वाढवणे. या अावृत्ती मध्ये bi directional text, offline voice detection, turn off notification app, त्याच बरोबर  shortcuts widgets, multichannel audio, google wallet, usb audio अाणि google now search app ईत्यादी.
    याच्या दुसर्‍या version मध्ये म्हणजे 4.2 मध्ये परत नवीन वैशीष्टे होती, ती म्हणजे नवीन clock designe, clock widgets,तसेच photospheres,daydream screen saver अाणि multiply user profile ई.
  *Android 4.4 KitKat
    Nexus 5 smarphone च्या बरोबर 4.4 kitkat या अावृत्तीला अाक्टोंबर २०१३ मध्ये स्थापित केले. गुगल च्या ईतिहासात पहील्यांदा असे झाले की, गुगल ने अापल्या android mascot साठी दुसर्‍या Brand बरोबर पार्टनर शिप केली. यामध्ये काही खास वैशिष्टे दिलेली होती.
   ती म्हणजे Home screen वर google now search, full screen app, Hangouts app, Downloads app, नवीन Dialer, नवीन clock तसेच Emoji support अाणि productivity enhancement, HDR+ ईत्यादि
  *Android 5.0 Lollipop
   १५ अाक्टोंबर २०१४ मध्ये या अावृत्तीला रीलीज केले. रीलीज होण्याच्या अगोदर याच्या नावावरुन लोकांमध्ये फार कंन्फुजन होते,कोणी याला Lemonhead तर कोणी Licorice, कोणी Lollipop म्हणत होते. पण जेव्हा रीलीज केले तेव्हा याचे नाव lollipop ठेवण्यात अाले.
  यामध्ये खुप सारे नवीन वैशिष्टे add करण्यात अाले,जे पहीले या मध्ये नव्हते.
  चांगले मटेरीयल Design, सर्वोत्कृष्ट colorful interfaces, playful transition अाणि खुप काही .Notitication मध्ये बदल करण्यात अाला, ज्याच्यामुळे तुम्ही Home screen वरच सर्व notification पाहु शकता, अाणि cancel पण करु शकता. त्याच बरोबर चांगला  battery backup होता.
  *Android 6.0 Marshmallow
  या अावृत्तीला ५ अाक्टोंबर २०१५ मध्ये प्रसिद्ध केले. यामध्ये काही महत्वपुर्ण बदल केले. जसे- google now on tap च्या मदतीने तुम्ही कोणत्याही apps ला बंद न करता दुसरे कोणतेही app खोलु शकता. त्याचबरोबर cut and paste मध्ये बदल केला गेला, ज्याच्यामुळे वापरकर्त्याला वापरायला सुलभ होईल.
  google settings एकाच app मध्ये, app permission मध्ये बदल करण्यात अाला, smart lock passwords, power saving options देण्यात अाले, quick setting menu ला सहजपणे edit करु शकतो, नवीन UI  tuner setting ई..
  *Android 7.0 Nougat
  या अवृत्तीला ४ अाक्टोंबर २०१६ ला रीलीज केले. या मध्ये फार अाकर्षक features अाहेत जसे,
Fingerprint  swipe down gesture, circular app icon support, Daydream UR mode,त्याचबरोबर pixel वापर कर्त्यांसाठी pixel launcher, google assistant, best quality photos & videos backup to Google photos , pixel camera app, Dynamic calender icon, chat support, smart storege ईत्यादी 

*Android 8.0 Oreo
   या अावृत्तीला १८ अागस्ट २०१७ मध्ये release केले. अाणि ही अाताची सर्वात letest अावृत्ती अाहे. पण सध्या ती फक्त काही डीवाईसेस मध्येच ऊपयोगात येते,जसे- Nexus 5x, Nexus 6p, Nexus player, Pixel, Pixel x1, pixel c अाणि ईतर smart phones मध्ये.
  पाहुया यामध्ये काय नविन अाहे,
तर यामध्ये picture in picture(PIP)अाहे, म्हणजेच तुम्ही एखादी movie पाहात अाहात अाणि तुम्हाला त्याच वेळेस एखादा email  पाठवायचा अाहे तर हे काम तुम्ही सहजपणे करु शकता.
  smart text selection,
  enhanced battery life,
  Notification Dots- जर एखाद्या app चे notification  अाले तर ते त्या apps च्या वर नजर येईल.
 नवीन Autofill feature,
google assistant चागल्या रुपात,
अाणि wi fi Awareness या मध्ये तुमचा मोबाईल एखाद्या wifi zone मध्ये अाल्यावर अापोअाप सुरु होईल.
शेवटचे म्हणजे safe अाणि secure ईत्यादी..


  तर मित्रांनो हे होते android चे अतापर्यंतचे अालेले सर्व versions(अावृत्या). त्यांची माहीती मि थोडक्यात सांगीतली अाहे,
  मित्रांनो हि पोस्ट कशी वाटली, याबद्दल तुम्हाला काय वाटते, टिप्पण्णी बाॅक्स (comment box ) मध्ये लीहुन तुमच्या प्रतिक्रीया जरुर कळवा.
   अाणि तुमच्या मित्रांना पण शेअर (shere)करा.
  धन्यवाद ।।
Have good day...

Monday, 26 March 2018

Android काय अाहे...? (what is Android ..in marathi)

नमस्कार मित्रांनो...
    आपला Android या ब्लाॅग site वर तुमचे स्वागत आहे.
मित्रांनो आपण यामध्ये तुम्ही वापरत असलेले Android fhones या बद्दल बरेच काहि जाणुन घेणार अाहोत. यातले तुम्हाला माहीत असेल किंवा नसेलही.
     तर मित्रांनो ही माझी android fhone बद्दल पहिलिच पोस्ट आहे.या मध्ये अापण जाणणार अाहोत कि android अाहे तरी काय ?? तर चला मग पुढे..

                  Android काय अाहे...?

  मित्रांनो Android अाता एक दशक पुरता अाहे आणि जगातिल सर्वात लोकप्रिय होत चाललेली अाॅपरेटिंग सिस्टम अाहे. अापल्याला ति अगदि मोबाईल फोन,टॅब्लेट,टीव्हि अाणि कारमध्ये सुध्दा अाढळेल. तर काय Android म्हणजे नक्की अाहे तरी काय..??? गुगल (google) च्या या मोबाईल अाॅपरेटिंग सिस्टम(OS) बद्दल जाणुन घेण्याची गरज ,उत्सुकता असेलच
  येथे मि अापल्याला android काय अाहे ,हे समजण्याठी मदत करु शकतो.
हे खरोखरच काय अाहे,काय करु शकते,अापण मिळवु शकता अशा उत्तम android डिव्हाइसेस काय आहेत.अापण android apps कसे वापरता,अाणि बरेच काही याशिवाय कसे करतात...??
     Android ही एक Operating System(OS)अाहे. जी विविध प्रकारच्या अाधुनिक उपकरणांवर अाढळते.तो एक असा साॅफ्टवेअरचा (software) भाग अाहे जो अापल्या हार्डवेअरला(hardware) कार्य करण्याची परवानगी देतो. Android OS अापल्याला गुगल (google) च्या स्वतच्या निर्मितिसह अनेक अॅप्स (apps) मध्ये प्रवेश देते. जसे हे अापल्याला वेबवर माहिती शोधण्यासाठी,संगित अाणि व्हिडिओ प्ले करण्यासाठी अनुमती देतात. नकाशावर अापले स्थान तपासुन अापल्या डिव्हाईस(Device) चा कॅमेरा वापरुन फोटो घेण्याची अनुमती,यांसारखे कार्य करतात.
   खरं तर android System हि एक Linux kernal वर अाधारीत अाहे.
सरळ भाषेत सांगायचे तर Linux एक आॅपरेटींग सिस्टम अाहे,ती मुख्यतः
सर्वर(server)अाणि डेस्कटाॅप कॅम्पूटर(desktop computer) मध्ये उपयोगात येते.तर android हे फक्त एक linuxचे वर्जन (virsion) अाहे.जे खुप सार्‍या बदलावांनी(modification) बनवले अाहे.
    android एक अशी अाॅपरेटींग सिस्टम अाहे तीला डिझाईन केले होते मोबाईला नजरेत ठेउन,म्हणजे fhone ची सर्व functions अाणि applications ला सहजपणे चालवले जाऊ शकेल.अाणि तुम्ही अाज जे काही फोन च्या Display वर पाहता तो एक अाॅपरेटिंग सिस्टिमचाच भाग अाहे.जेव्हा तुम्ही एखादा काॅल,टेक्स्ट मेसेज किंवा ई-मेल घेता ,तेव्हा अाॅपरेटिंग सिस्टिम त्यांना प्रोसेस(prosses)करत असते.अाणि तुमच्या समोर ते वाचनिय स्वरुपात अाणते.
    android OS शिवाय यापैकी काहीहि शक्य नाही.android Fhone अत्यंत सानुकुल अाहेत .म्हणुन ते अापल्या वैयक्तिक अभीरुचीनुसार अाणि गरजा भागविण्यासाठी बदलता येतील.जसे-अापण वाॅलपेपर,थिम अाणि प्रक्षेपण सेट करु शकता. ज्याने अापल्या डिव्हाईस(device)चे रीप पुर्णपणे बदलुन जाते.
     Android OS ला खुप सार्‍या वर्जन(version)मध्ये वाटले गेलेले अाहे ,त्यांचे Features अाणि अाॅपरेशन स्थिरतेनुसार त्यांना वेगवेगळे नंबर अाणि नावे दिलेली अाहेत. ति तुम्ही ऐकली अासतीलच, जसे-android lolipop, marshmallow or Nougat हे सर्व android वर्जन चिच नावं अाहेत.
  तर मित्रांनो android काय हे तुम्हाला थोडक्यात समजले असेलच, पुढच्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला android च्या वेगवेगळ्या वर्जनांबद्दल माहिती सांगणार अाहे .तर कृपया वाचत राहा अापला Android

     हि माझी पहिलीच पोस्ट अाहे ,कृपया काही चुकले असेल तर माफ करा, अावडले तर अापल्या मीत्रांना पण share करा. अाणि पोस्ट कशी वाटली ते  comment मध्ये जरुर कळवा..धन्यवाद..।

Android mobile मध्ये Screen lock / Pattern lock /Pin lock कसे लावावे ..? ?

  नमस्कार मित्रांनो,   आज च्या  या पोस्ट मध्ये  आपण  जाणुन घेणार आहोत की  screen lock /pattern  lock  किंवा pin lock  कसे  set करतात ... ...